Pre-Monsoon Rains in Mumbai: मुंबईकर सुखावले; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Watch Videos)

गेले काही महिने प्रचंड उकाड्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनची वाट पाहत आहे

Rains | File image | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शहरातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः दक्षिण मध्य आणि उत्तर भागात हलका पाऊस पडू लागला आहे. रात्री 11 वाजेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेले काही महिने प्रचंड उकाड्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनची वाट पाहत आहे. त्यामुळे आजच्या या मॉन्सून पूर्ण सरींमुळे नागरिक सुखावले आहेत. सोशल मिडियावरही मुंबईकरांनी पावसाचा आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचेल, असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले की, मान्सूनने 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement