Prashant Koratkar Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या फरार प्रशांत कोरटकर ला तेलंगणा मधून अटक - रिपोर्ट्स

25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर फरार आहे. अखेर त्याला महिन्याभरानंतर अटक झाली आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या,आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणा मधून पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केल्याचे वृत्त आहे. 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर फरार आहे. दरम्यान तो दुबईला पळून गेल्याच्या चर्चा होत्या पण आता त्याला तेलंगणतून बेड्या ठोकण्यात आल्याचं समोर आलं आहे. जामिनासाठी अर्ज केलेल्या कोरटकरला दोनदा कोर्टाकडून संरक्षणही मिळाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement