Powai-JVLR Traffic Update: जोगेश्वरीच्या जनता कॉलनी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे पर्यंत चालणार; वाहतूक कोंडीची शक्यता

यामुळे या परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Traffic (Photo Credit- PTI)

Powai-JVLR Traffic Update: पवई-जेव्हीएलआर मार्ग हा गेल्या काही वर्षात वाहतूककोंडीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जे. व्ही. एल. आर. ब्रिजच्या दक्षिण हद्दीवरील जनता कॉलनी, जोगेश्वरी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यामुळे या परिसरात नागरिकांना अजून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. आजही जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे उत्तर व दक्षिणवाहिनी अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. (हेही वाचा: Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif