Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण! (View Tweets)
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे पूलावरील एकच लेन सध्या वाहतूकीसाठी खुली आहे.
मुंबई मध्ये आज जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर मिलिंदनगर भागात तातडीने देखभालीचं काम हाती घेण्यात आल्याने ट्राफिक पोलिसांनी देखील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आज या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकच लेन वाहतूकीसाठी खुली असल्याने काही जण एकाच जागी सुमारे 45 मिनिटं अडकून पडली आहेत. Powai- JVLR Traffic Jam: मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पवई-जेव्हीएलआरमध्ये वाहतूक कोंडी अपेक्षित, मुंबई वाहतूक पोलिसांनी सुचविले पर्यायी मार्ग .
पहा मुंबईकरांनी व्यक्त केलेला रोष
मुंबई ट्राफिक पोलिसांचं आवाहन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)