Ajit Pawar Hoarding: 'अजित पवार जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री', सासरवाडीतही झळकले होर्डींग्ज, तेर गावची राज्यभर चर्चा
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे देखील घातले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री (future CM) होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे देखील घातले आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)