Police Constable Recruitment: सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये होणार 145 पदांची भरती; जाणून घ्या कुठे कराल अर्ज

सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 145 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.

Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. 23-6-2022 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक, सातारा यांचे आस्थापनेवर सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 145 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि.09-11-2022 ते 30-11-2022 या कालावधीत स्विकारण्यात येतील. या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now