Hinjewadi IT Hub मधील लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी PMRDA कडून ई-टेंडर जाहीर

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी आर्थिक व आयटी हबमधील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या (पीएमसी) नियुक्तीसाठी ई-टेंडर जाहीर केले आहे. इच्छुक सल्लागारांना २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

PMRDA

हिंजवडी हा पुणे महानगर प्रदेशातील प्रमुख आयटी व आर्थिक केंद्रांपैकी एक असून, या भागात दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी ये-जा करतात. मात्र येथील अंतर्गत रस्ते व शेवटच्या टप्प्यातील दळणवळण (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.  या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने हिंजवडी परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सुरळीत आणि सक्षम करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी येथील आर्थिक व माहिती तंत्रज्ञान (आयटी) हबमधील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या (पीएमसी) नियुक्तीसाठी ई-टेंडरिंगद्वारे प्रस्ताव मागवले आहेत. इच्छुक व पात्र सल्लागार संस्थांना विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: हिंजवडीतील 5 बड्या IT कंपन्यांना मेट्रो स्थानकांशी जोडणारे पादचारी पूल बांधण्यासाठी विचारणा; 90 हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा.  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement