Policeman Assaults PMPML Bus Driver: पोलिस कर्मचाऱ्याची पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ

या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर बसच्या समोर दुचाकी लावली. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बस चालक पोलिस कर्मचाऱ्याला आपली चूक काय? हे विचारताना दिसत आहे.

Policeman Assaults PMPML Bus Driver (PC - X/@fpjindia)

Policeman Assaults PMPML Bus Driver: पुण्यातून सलग दुसऱ्या दिवशी रोड रेज घटना समोर आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहेत. व्हिडिओमध्ये हेल्मेट परिधान केलेला पोलिस कर्मचारी पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर बसच्या समोर दुचाकी लावली. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बस चालक पोलिस कर्मचाऱ्याला आपली चूक काय? हे विचारताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवर शनिवारी एका महिलेवर कार चालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. शनिवारी बाणेर-पाषाण लिंक रोड येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी 57 वर्षीय पुरुष आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now