PM Narendra Modi Pune Visit Cancelled: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा पावसामुळे रद्द
यामुळे रस्ते जलमय झाले होते. सभास्थळी देखील चिखल असल्याने आजचा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, 26 सप्टेंबरचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. काल पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात 1938 नंतर म्हणजेच 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. सभास्थळी देखील चिखल झाला आहे. त्यामुळे जनहित आणि सुरक्षा पाहता आजचा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आज मोदी पुण्यात 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी येणार होते.
पीएम मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)