‘पीएम नरेंद्र मोदी हे निवडणुकांसाठी भावनात्मक खेळ करून देशाचे विभाजन करत आहेत’- Congress
काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर उभे राहून लोकांना इतरत्र जाण्यास उद्युक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संसदेमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. आपल्या भाषणामध्ये पीएम मोदी म्हणाले होते की, कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या. पहिल्या लाटेत देश लॉकडाऊनमध्ये होता. जिथे आहात तिथेच रहा असे आरोग्य तज्ज्ञ सांगत होते, परंतु काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर उभे राहून लोकांना इतरत्र जाण्यास उद्युक्त केले. यावर आता कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसने म्हटले आहे की, ‘लॉकडाऊनमध्ये लोकांचा पोटापाण्याचा आणि रोजीरोटीचा प्रश्न महाराष्ट्राने सोडवला आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोक चालत घरी जात होते त्यावेळी मायेचा आणि ममतेचा हात सोनिया गांधींना दाखवला. त्यावेळी अशा लोकांना तिकिट्स देऊन त्यांना योग्य पद्धतीने गावाला जाता यावा हा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे या देशात कोरोना पसरवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी भावनात्मक खेळ करून देशाचे विभाजन करू नका. तुम्ही विभाजनजीवी झाला आहात असा कॉंग्रेसचा आरोप आहे.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)