PM Narendra Modi Hails Mahayuti's Maharashtra Victory: 'हा विकासाचा, सुशासनाचा विजय आहे'; महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर पीएम नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दणदणीत विजयाचे कौतुक केले.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI/X)

Maharashtra Assembly Election Results: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दणदणीत विजयाचे कौतुक केले आणि म्हटले की, हा विकास आणि सुशासनाचा विजय आहे. ‘एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार.’ याबाबत केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘विकासाचा विजय! सुशासनाचा विजय! आम्ही सर्व एकत्र आणखी उंच जाऊ! एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!’

ते पुढे म्हणतात, ‘एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेल्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे. त्यांनी कठोर परिश्रम केले, लोकांमध्ये जाऊन आमचा सुशासनाचा अजेंडा स्पष्ट केला.’ दरम्यान, महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री चेहरा अद्याप ठरलेला नाही, ज्याच्या जास्त जागा असतील तोच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हे वरिष्ठ नेते ठरवतील. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' ठरली महायुतीसाठी गेमचेंजर; विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा)

महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर पीएम नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)