Pimpir Chinchwad Car Accident Videos: कारने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; पिंपरी चिंचवड येथील घटना; व्हिडिओ व्हायरल
पिंपरी चिंचवड शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार रस्त्यावरुन मागे घेतली जात आहे आणि थोड्याच वेळात ती पुन्हा भरधाव वेगाने पुढे येत आहे. रस्त्यावरील लोकांना चिरडण्याचा कार चालकाचा विचार स्पष्ट दिसतो. पण, लोक बाजूला सरकल्याने त्याचा विचार पूर्णत्त्वास जात नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार रस्त्यावरुन मागे घेतली जात आहे आणि थोड्याच वेळात ती पुन्हा भरधाव वेगाने पुढे येत आहे. रस्त्यावरील लोकांना चिरडण्याचा कार चालकाचा विचार स्पष्ट दिसतो. पण, लोक बाजूला सरकल्याने त्याचा विचार पूर्णत्त्वास जात नाही. पण, पुढे एक महिला रस्त्यावर उभी असते तिला धडक देऊन हा कारचालक पुढे जातो. विवेक गुप्ता नावाच्या सोशल मीडिया युजरने @imvivekgupta नामक एक्स हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. दावा केला जात आहे की, कारचालक अल्पवयीन आहे. दरम्यान, कारचालक, त्याचे वय आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या ठिकाणची ही घटना आहे याबातब अद्याप पुरेसा तपशील उपलब्ध झाला नाही. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Mumbra Accident: अनियंत्रित ट्रकची धडक, अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुंब्रा येथील घटना)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)