Pig Attack on Child Video: लहान मुलावर डुकराचा हल्ला, गोंदिया येथील घटान (पाहा व्हिडिओ)

विविध घटनांतील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. पण आता मोकाट डुकरेही त्रासदायक ठरु लागली आहेत.

Pig Attack on Child | (Photo Credit - Twitter)

मोकाट आणि पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलं, नागरिक जखमी झाल्याच्या काही प्रसंगी मृत्यूही झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. विविध घटनांतील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. पण आता मोकाट डुकरेही त्रासदायक ठरु लागली आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गोंदिया येथील असल्याचे बोलले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

गोंदीया येथील असल्याचा हा व्हिडिओ एक सीसीटीव्ही फुटेज आहे. जे @imvivekgupta या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, लहान मुले रस्त्यावर खेळत आहेत. इतक्यात एक डुक्कर तिथे येते आणि त्यातीलच एका मुलावर हल्ला करते. मुलगा मदतीसाठी गयावया करतो. त्याचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी येतात. त्या डुकराला हुसकावून लावतात. ज्यामुळे या मुलाचे प्राण वाचतात.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)