पनवेल परिसरातील कळंबोली, नवीन पनवेल (E&W), करंजाडे आणि काळूंद्रे नोडस् परिसरात येत्या सोमवारी म्हणजे 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.00 ते सांयकाळी 9.00 या कालावधीत पाणीपूरवठा बंद राहणार आहे. वायाळ उपकेंद्रातील विविध विद्युत कामांसाठी आणि फिडर मेन लाईनवरील आपत्कालीन दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) द्वारा देण्यात आली आहे.
एक्स पोस्ट
मजीप्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार, वायाळ उपकेंद्रातील विविध विद्युत कामांसाठी आणि फिडर मेन लाईनवरील आपत्कालीन दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल (E&W), करंजाडे आणि काळूंद्रे नोडस् येथे दि. ३०/१०/२०२३ (सोमवार) स. ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. pic.twitter.com/Vqcr2QCEWR
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) October 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)