Pankaja Munde-Dhananjay Munde: दूर झाली कटूता! राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण (Watch Video)

परळी मध्ये एनसीपी आणि भाजपा यांच्यामध्ये कट्टर वैर असल्याने 2024 च्या निवडणूकीत आता काय चित्र दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Dhananjay Munde | Twitter

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतीक अजित पवारांसह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहेणजेध. त्यापैकी एक नाव म्हणजे धनंजय मुंडे! त्यांच्या शपथविधीनंतर आता चुलत बहीण आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांचं औक्षण केले आहे.  हा भावनिक क्षण त्यांनी सोशल मीडीया पेज वर शेअर देखील केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत हेच भाऊ बहीण एकमेकांविरूद्ध उभे ठाकले होते. त्यावेळी एकमेकांवर टीका देखील झाली होती. नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: शरद पवार रूपी आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलयं; छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा पहिल्याच मेळाव्यात हल्लाबोल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now