Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी (Watch Video)

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत.

Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी (Watch Video)
vidhi Mandal | Twitter

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दुसर्‍या दिवशी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधक राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत. 'गेली ती शिवशाही आली ती गुंडाशाही' अशा घोषणा दिल्या आहेत. आज अर्थसंकल्प मांडला जाणार असून 1 मार्च पर्यंत हे अधिवेशन असणार आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2024 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).