Online Crimes in Maharashtra: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; नव्या सेंटरची स्थापना, त्वरित कारवाईसाठी जारी केला हेल्पलाईन क्रमांक
'तंत्रज्ञान सुसज्ज पोलीसिंग'मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार आहे. यामार्फत येत्या काळात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षित पोलीस दल महाराष्ट्राकडे असेल.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट'चे (MahaCyber-Maharashtra Cyber Security Project) महापे, नवी मुंबई येथे उदघाटन झाले. यासोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी 14407 हा हेल्पलाईन क्रमांकदेखील लॉंच केला. काळाची पावले ओळखत 2017-18 मध्ये सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 'महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट'ची सुरुवात केली होती. 2019 मध्ये सरकार बदलल्यावर हा प्रकल्प 'कपाटबंद' झाला. परंतु पुन्हा सरकार आल्यावर या प्रोजेक्टला पुढे नेण्याचे काम झाले. महाराष्ट्र भारताची फिनटेक राजधानी आहे. 'तंत्रज्ञान सुसज्ज पोलीसिंग'मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार आहे. यामार्फत येत्या काळात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षित पोलीस दल महाराष्ट्राकडे असेल.
'Learn, unlearn आणि relearn' हा 21 व्या शतकाचा मंत्र आहे. तंत्रज्ञान नेहमी बदलत असते, त्यामुळे तंत्रज्ञानातील प्रणाली हाताळणारे लोक गतिमान असायला हवेत. या केंद्रामार्फत दरवर्षी 5000 पोलिसांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. या केंद्राच्या मार्फत खासगी कामे घेणे शक्य असल्याने महसूल प्रवाह तयार होऊ शकतो, असेही फडणवीस यांनी यावेळी सुचवले. (हेही वाचा: Cyber Frauds in Pune: पुण्यात अवघ्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीत 163 कोटींची लूट; 8 प्रकरणांमध्ये 15 अटक, केवळ 91.34 लाख रुपये वसूल)
MahaCyber-Maharashtra Cyber Security Project-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)