Online Cab Services: ॲप आधारित वाहनांच्या सेवेसाठी लागू होणार नियम; नागरिकांना 9 मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे आवाहन

सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे.

Ola, Uber | Twitter

केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी  मार्गदर्शक सूचना  जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. नागरिकांची  मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार  करण्यात येणार आहे. तरी या बाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक ९ मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त, यांनी  केले आहे. या विषयी अधिक माहितीसाठी  कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommt.enf1@gmail.com)  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement