Omicron Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबई अलर्टवर; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली उपाय योजनांबाबत माहिती

कोरोना विषाणूच्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटमुळे करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली

Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणूच्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटमुळे करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, 'आम्ही RT-PCR चाचण्या घेत आहोत. नवीन प्रकारामुळे प्रभावित झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अनिवार्य क्वारंटाईनचा नियम लागू करण्यात आला आहे. आमचे आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड आणि मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे आणि रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यास आम्ही सर्व काही करण्यास तयार आहोत.'

त्या पुढे म्हणाल्या, '1 डिसेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील, परंतु अद्याप मुलांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे, कदाचित पालक आपल्या मुलांना पाठवणार नाहीत. तरीही ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement