सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या परिपत्रकाबाबत एसटी महामंडळाने केला 'हा' खुलासा
संपात सहभागी असलेले एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार, प्रमादीय कार्यवाही करण्यात यावी, असे एक पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मात्र, अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलं आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने आपल्या ट्विट हँडलवर माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)