Good Samaritan: आता अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला मिळणार पुरस्कार

रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरित करतात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Accident | Representational Image (Photo Credits: Pixabay)

केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरित करतात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)