No School Holiday in Mumbai by BMC: मुंबईमध्ये उद्या शाळांना सुट्टी नाही; हवामान आणि पावसाची स्थिती सामान्य, जनजीवन सुरळीत, BMC ची माहिती
मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.
No School Holiday in Mumbai by BMC: महाराष्ट्रातील सध्याची मुसळधार पावसाची स्थिती पाहता पुणे, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने उद्यासाठीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मात्र उद्या मुंबईमधील शाळांचे वर्ग सुरळीत सुरु राहणार आहेत. मुंबईमध्ये उद्या शाळांना सुट्टी नसेल. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. बीएमसीने सांगितले की, ‘मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नियमितपणे सुरू राहतील. कृपया, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे.’ अधिक माहितीसाठी शाळा व महाविद्यालये व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा: Navi Mumbai Schools Closed Tomorrow: हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा; नवी मुंबईतील शाळा उद्या राहणार बंद)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)