Navi Mumbai Schools Closed Tomorrow: हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा; नवी मुंबईतील शाळा उद्या राहणार बंद
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Navi Mumbai Schools Closed Tomorrow: मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आह्रे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. आयएमडीने उद्याही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
महापालिकेने सांगितले आहे, ‘सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन, तसेच हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.’ (हेही वाचा: Thane Schools Closed Tomorrow: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; आदेश जारी)
पहा पोस्ट-
नवी मुंबई महानगरपालिका
महत्वाचे
सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन तसेच हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व… pic.twitter.com/CK4xcCu4VA
— Navi Mumbai Municipal Corporation (@NMMConline) July 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 09:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

