'कोणताही पक्ष आमचा राहण्या-जेवणाचा खर्च करत नाही, आम्ही स्व-खर्चाने इथे राहिलो आहोत'- MLA Deepak Kesarkar

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लूमध्ये हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले आमदार त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी राहिले आहेत.

दीपक केसरकर ((Photo Credit : twitter/dvkesarkar)

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष (BJP) त्यांच्या बंडखोरीमागे नाही. तसेच गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लूमध्ये हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले आमदार त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी राहिले आहेत. इथला राहण्या-जेवणाचा खर्च ते स्वतःच करणार आहेत. केसरकर म्हणाले, ‘कोणताही पक्ष आमचा खर्च (हॉटेल-निवासाचा) देत नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावले आणि आम्ही येथे (गुवाहाटी हॉटेल) आलो. प्रत्येक आमदाराला चांगला पगार मिळतो त्यामुळे प्रत्येकजण स्वतःचा खर्च स्वतः करत आहे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now