Sanjay Raut Criticized BJP: आज या देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

निवडणूक भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे लोकांना दुखवण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. हा प्रकार सध्या सुरू आहे. रशिया आणि चीन सारखीच परिस्थिती सध्या भारतात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut Criticized BJP: शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजपवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'निवडणूक भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे लोकांना दुखवण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. हा प्रकार सध्या सुरू आहे. रशिया आणि चीन सारखीच परिस्थिती सध्या भारतात आहे. लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य लोकच ठरवतील,' असंही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केलं. (Arvind Kejriwal's First Reaction After Arrest: 'माझे जीवन देशासाठी समर्पित आहे'; अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया)

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement