'राष्ट्रवादीतील कोणीही कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच इतर कोणीही आमच्या संपर्कात नाही'- Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

Ajit Pawar (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी एकत्रपणे मजबूत आहे. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून 10 महिने झाले, पण त्यांच्या युतीचा उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. या सरकारबद्दल सर्वसामान्य नागरिक समाधानी नाही.’ यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, राष्ट्रवादीतील कोणीही कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच इतर पक्षातील कोणीही त्यांच्या संपर्कात नाही.’ (हेही वाचा: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दिल्ली युनिटचा शुभारंभ; शहरात विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' राबविण्याची ग्वाही)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now