Nidhi Choudhari यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती; राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात महाविकास आघाडी भागीदारांशी मतभेद झाल्यानंतर, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची संचालक आयटी (IT) म्हणून बदली केली होती. मात्र अवघ्या दोनच दिवसात त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे

Nidhi Choudhari यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती; राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Nidhi Choudhari (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात महाविकास आघाडी भागीदारांशी मतभेद झाल्यानंतर, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची संचालक आयटी (IT) म्हणून बदली केली होती. मात्र अवघ्या दोनच दिवसात त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.  तसेच सध्या या पदावर जिल्हाधिकारी असणारे मिलींद बोरीकर यांची पर्यटन विभागात संचालक या पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

याशिवाय अन्य सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जयश्री भोज यांना राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून राज्य पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली आहे. डॉ निरुपमा डांगे यांची सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2021 07:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).