औरंगाबाद जिल्ह्यातील Make In India अंतर्गत निर्मित व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त चुकीचे; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे आहे.

Hospital (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आले असल्याचे केंद्र सरकरने सांगितले आहे. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसी या भारतीय कंपनीने 150 व्हेंटीलेटर्सचा पुरवठा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गतच्या केला आहे. राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. या पुरवठादारांना पीएम केअर्स फंड मधून निधी देण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now