Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये सामील झालो, अजित पवारांनी केले स्पष्ट

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Ajit Pawar

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. 2019 साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण  9आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये दाखल झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्याच्या प्रगतीसाठी, राज्यात जास्तीत जास्त निधी यावा यासाठी आम्ही सरकारमध्ये दाखल झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement