Toll Free Numbers for Women: राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक जाहीर; यशोमती ठाकूर यांची माहिती
विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंतही यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Toll Free Numbers for Women: राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. आता महिलांना 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येणार आहे. येत्या 7 ते 8 दिवसात हा टोल फ्री क्रमांक कार्यरत होईल. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘आरे ला कारे’ म्हणण्याची ताकद महिलांमध्ये असली पाहिजे. महिलांवरील अत्याचार खालच्या वर्गातच होत नाहीत, चांगल्या घरातही होत आहेत. विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंतही यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)