New Mumbai: नेरुळ येथे बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला; कोणीही आले नाही मदतीला, पहा धक्कादायक CCTV फुटेज (Watch)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्तीने तरुणीवर जीवघेणे वार करत आहे. महत्वाचे म्हणजे तरुणीवर हल्ला होत असताना तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी एकही जण तिच्या मदतीला समोर आला आला नाही.

मुलीवर जीवघेणा हल्ला

नवी मुंबईतील नेरुळ येथे बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याचे प्रकरण समोर येत आहे. नेरूळच्या एका बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्तीने तरुणीवर जीवघेणे वार करत आहे. महत्वाचे म्हणजे तरुणीवर हल्ला होत असताना तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी एकही जण तिच्या मदतीला समोर आला आला नाही. निशा कुंभार असे या पिडीत तरुणीचे नाव असून ती ऐरोलीतील रहिवासी आहे. ती नेरुळ येथील एका महाविद्यालयात परीक्षेसाठी आली होती. त्यावेळी हुसेन इमाम हसन शमशु या व्यक्तीने तिच्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. अहवालानुसार, हल्लेखोराला अर्धा तासाच्या पकडण्यात आले. (हेही वाचा: ठाण्यात बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रेयसीला SUV ने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न; पिडीतेने सोशल मिडियावर कथन केली घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement