New Covid-19 Variant: दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथील सर्व प्रवाशांचे लसीकरण झाले असले तरी पुनः तपासणी होणार- BMC
बीएमसी (BMC) ने आज नवीन कोरोना विषाणू व्हेरिएंटबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती
बीएमसी (BMC) ने आज नवीन कोरोना विषाणू व्हेरिएंटबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी गेल्या पंधरवड्यातील त्यांच्या प्रवासाची माहिती देणारे स्व-घोषणा पत्र प्रदान करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथील सर्व प्रवाशांची लसीकरण प्रमाणपत्रे किंवा आरटीपीसीआर चाचणी असल्यासही पुनः तपासणी करण्यात येईल. त्यांना गृह विलागिकरणात ठेऊन त्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा नमुना जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी पाठविला जाईल. तसेच विविध आस्थापना, दुकाने, मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे बीएमसी आयुक्तांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)