Maharashtra-Karnataka Border Row: मुंबईतील पवई परिसरात कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शने
राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. मुंबईतील पवई परिसरात कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Maharashtra-Karnataka Border Row: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी या मुद्द्यावरून निदर्शने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील पवई परिसरात कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. आज नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून नाशिकमध्ये असलेल्या कर्नाटक बँकेच्या समोर आंदोलन करण्यात आले आहे. तसेच कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)