NCP Workers Protest Against ED: जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजेरी लावणार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत आंदोलन

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

NCP Protest

आयएल अॅण्ड एफएसच्या कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता ते ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी याविरोधात भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now