Baba Siddique Passes Away: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
Baba Siddique Passes Away: राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडल्याची माहिती आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. दरम्यान सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)