NCP President: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी Sharad Pawar यांची 4 वर्षांसाठी एकमताने फेरनिवड

हा निर्णय समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेतला आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हा निर्णय समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेतला आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्यही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे आज पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या दिल्लीतच राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व मोठे नेते दिल्लीत पोहोचले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now