NCP Crisis: शरद पवारांना मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांचा Ajit Pawar यांना पाठिंबा, पाठवले पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड युनिटचे अध्यक्ष वांथुंग ओडिओ यांनी सांगितले की, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Ajit Pawar | Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षप्रमुख शरद पवार पक्षावर आपापले दावे करत आहेत. अशात आता पुन्हा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड युनिटचे अध्यक्ष  वांथुंगो ओडियुओ (Vanthungo Odyuo) यांनी सांगितले की, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. (हेही वाचा: Women Commission Letter To Mumbai Police: किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना पत्र)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement