Maharashtra Politics: अजित पवारांनी मुंबईत केलं पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन; 'शरद पवार'यांच्या तसबिरीनं वेधलं लक्ष (Watch Video)

अजित पवार यांनी 8 एनसीपी आमदारांसोबत 2 जुलै दिवशी राजभवनावर मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

हो नाही म्हणता म्हणता अखेर अजित पवार यांनी एनसीपी मध्ये फूट घडवून आणलीच. रविवार 2 जुलैच्या दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी शरद पवारांपासून दूर होत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. आपल्या सोबत आमदारांची फौज असल्याचा दावा करणार्‍या अजित पवारांनी दक्षिण मुंबई मध्ये मंत्रालयासोबत पक्षाच्या नव्या कार्यलायचं आज उद्घाटन केले आहे. या कार्यालयात शरद पवारांचाही फोटो पहायला मिळाला आहे. शरद पवारांनी मात्र आपल्या विचारांशी तडजोड करणार्‍यांनी माझ्या हयातीत फोटो न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, NCP, महाविकासआघाडी, अजित पवार गट यांच्यात सकाळपासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना .

पहा अजित पवारांच्या एनसीपीचं नवं पक्ष कार्यालय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now