NCP chief Sharad Pawar: विरोधकांच्या बंगळुरु येथील बैठकीस शरद पवार राहणार अनुपस्थित
दरम्यान, या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पाटणा येथील बैठकीनंतर विरोधकांनी बंगळुरु येथे दुसऱ्या बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी आयोजित स्नेहभोजनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही याबातब वृत्त दिले आहे. बंगळुरु येथे आजपासून दोन दिवसांच्या विरोधकांच्या बैठकीला सुरुवात होत आहे.
दरम्यान, पाटणा येथील बैठकीपेक्षा बंगळुरु येथील बैठकीत विरोधकांच्या बैठकीला अधिक महत्त्व आले आहे कारण, या बैठकीला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांची संख्याही वाढली आहे. दरम्यान, स्नेहभोजनास शरद पवार उपस्थित राहणार नसले तरी, ते उद्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)