NCC Student Assaulted Viral Video: जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणी वर प्राचार्या सुचित्रा नाईक यांची प्रतिक्रिया, 'संबंधितांवर कारवाई होणार'!

जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणीवर कॉलेज कडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

Viral Video | Twitter

जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे. यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या व्हिडिओ वर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ मधील मारहाण करणारी व्यक्ती कॉलेजची शिक्षक नाही. कॉलेजमध्ये असा प्रकार सहन केला जाणार नाही. ज्यांच्यासोबत हे घडलं आहे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Viral Video: NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण; रोहित पवारांकडून घटनेची चौकशी करण्याची मागणी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement