Navy Day 2023 Celebrations: पीएम Narendra Modi यांची सिंधुदुर्ग येथे 'नेव्ही डे 2023' सोहळ्याला हजेरी; केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण (Watch)
नौदल दिनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धाचे स्मरण केले जाते आणि भारतीय नौदलाच्या अविस्मरणीय विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
Navy Day 2023 Celebrations: दरवर्षी 4 डिसेंबर रोजी देशात ‘नौदल दिन’ साजरा केला जातो. नौदल दिनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धाचे स्मरण केले जाते आणि भारतीय नौदलाच्या अविस्मरणीय विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. या दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
या 'नौदल दिन 2023' समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्र परावलंबीपणाची मानसिकता सोडून पुढे जात आहे. मला आनंद आहे की आमच्या नौदल अधिकाऱ्यांनी परिधान केलेल्या इपॉलेटवर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पाहायला मिळेल. नवीन इपॉलेट आता शिवाजी महाराजांच्या सैन्याचे प्रतीक असेल. हे माझे भाग्य आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेशी नौदल ध्वज जोडण्याची संधी मिळाली.’ (हेही वाचा: Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg: सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण PM Modi यांच्या हस्ते संपन्न)