Nashik: तुरुंगातून सुटल्याच्या आनंदात 'भाऊं'नी काढली जल्लोष रॅली; Reel व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा अटक (Video)
त्यानंतर अनधिकृत रॅलीचे आयोजन करून सार्वजनिक गोंधळ घातल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाटणकर आणि त्यांच्या सहा साथीदारांना अटक केली.
महाराष्ट्रातील नाशिकमधील कुख्यात गुंड हर्षद पाटणकरची 1 वर्षानंतर तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी हर्षदने आपल्या कार्यकर्त्यांसह, बेथेल नगर ते आंबेडकर चौक अशी मेगा 'कमबॅक' रॅली काढली. आता या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. नाशिक शहर पोलिसांनी याची माहिती दिली आहे. अहवालानुसार, 23 जुलै रोजी पाटणकरची तुरुंगातून सुटका झाल्याने त्याच्या समर्थकांनी जल्लोष रॅली काढली. बेथेल नगर ते आंबेडकर चौकापर्यंत कार आणि सुमारे 15 दुचाकींचा ताफ्यासह ही रॅली पार पडली. त्यानंतर अनधिकृत रॅलीचे आयोजन करून सार्वजनिक गोंधळ घातल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाटणकर आणि त्यांच्या सहा साथीदारांना अटक केली. अहवालानुसार, पाटणकरवर यापूर्वीच्या खटल्यांमधून खुनाचा प्रयत्न, चोरी आणि हिंसाचार यासह अनेक आरोप आहेत.
नाशिक पोलिसांनी असेही सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत नागरिकांनी त्यांना इंस्टाग्राम/फेसबुक/ट्विटर मेसेजेसद्वारे 91 रील्स पाठवल्या, ज्यावर त्यांच्या सायबर पेट्रोलिंग उपक्रमांतर्गत कारवाई केली जात आहे. हेही वाचा: Thane Shocker: शिर्डीला जात असताना लॉजवर दारू आणि मँगो ड्रिंक प्यायल्यानंतर 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)