Nashik: मध्यरात्री विहिरीत पडला बिबट्या; सकाळी ग्रामस्थांनी 'असे' वाचवले प्राण (Watch Video)
ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत लोखंडी खाट सोडली व बिबट्याचे प्राण वाचवले.
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मध्यरात्री एक बिबट्या विहिरीत पडला. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा जीव वाचवला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली गेली. हे प्रकरण नाशिकच्या जाखोरी गावातील आहे. मध्यरात्री बिबट्या विहिरीत पडल्यावर बराच वेळ तसाच पडून राहिला होता. सकाळी बिबट्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांच्या ही बाब धान्यात आली. ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत लोखंडी खाट सोडली व बिबट्याचे प्राण वाचवले. वाहनातून बिबट्याला नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेत ठेवण्यात आल्याचे वनरक्षक अनिल अहिरराव यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)