Narendra Modi यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण; X वर खास मराठीत पोस्ट
बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले आहे.
भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 12व्या स्मृतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी आज मराठीत पोस्ट शेअर केली आहे. 'महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांचा धीरगंभीर आवाज आणि अढळ ध्येयासक्ती येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील.' असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे. Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; शिवसैनिकांकडून शिवाजी पार्क वर स्मृतीस्थळी रीघ (Watch Video).
नरेंद्र मोदी यांची मराठीत पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)