Narendra Modi यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण; X वर खास मराठीत पोस्ट
बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले आहे.
भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 12व्या स्मृतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी आज मराठीत पोस्ट शेअर केली आहे. 'महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांचा धीरगंभीर आवाज आणि अढळ ध्येयासक्ती येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील.' असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे. Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; शिवसैनिकांकडून शिवाजी पार्क वर स्मृतीस्थळी रीघ (Watch Video).
नरेंद्र मोदी यांची मराठीत पोस्ट
महान बाळासाहेब ठाकरे जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ…
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2024 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

