BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातील विरोधकांनी राज्यपालांवर ह्ललाबोल केला आहे. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीसह (NCP) मनसेने (MNS) देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर टीका केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तातडीने हटवण्यात यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)