Nagpur Petrol Pump Fire: इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेला तरुण; मोबाईलची रिंग होताच बाईकला लागली आग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch Viral Video)
व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी एका दुचाकीमध्ये इंधन भरत आहे व त्यावेळी वाहन चालकाला एक कॉल येतो.
महाराष्ट्रातील नागपुर येथील पेट्रोल पंपावर दुचाकीला आग लागल्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारण 30 सेकंदांची व्हिडिओ क्लिप पेट्रोल पंपावर आपल्या बाइकमध्ये इंधन भरण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकांनी सुरू होते. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी एका दुचाकीमध्ये इंधन भरत आहे व त्यावेळी वाहन चालकाला एक कॉल येतो. दुचाकीचालक कॉल घ्यायला जातो इतक्यात गाडीला मोठी आग लागते. अचानक लागलेल्या या आगीमुळे दुचाकीचालक व त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गाडीवरून खाली उतरतात. त्यानंतर काही वेळातच पेट्रोल पंपावरील कर्मचारी ही आग आटोक्यात आणतात. (हेही वाचा: Pune: टॉवेलने खेळत असताना नकळत लागला फास; 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कात्रज येथील घटना)
व्हिडीओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Advertisement
Advertisement