Nagpur Petrol Pump Fire: इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेला तरुण; मोबाईलची रिंग होताच बाईकला लागली आग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch Viral Video)

व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी एका दुचाकीमध्ये इंधन भरत आहे व त्यावेळी वाहन चालकाला एक कॉल येतो.

Nagpur Petrol Pump Fire: इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेला तरुण; मोबाईलची रिंग होताच बाईकला लागली आग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch Viral Video)
Nagpur Petrol Pump Fire

महाराष्ट्रातील नागपुर येथील पेट्रोल पंपावर दुचाकीला आग लागल्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारण 30 सेकंदांची व्हिडिओ क्लिप पेट्रोल पंपावर आपल्या बाइकमध्ये इंधन भरण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकांनी सुरू होते. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी एका दुचाकीमध्ये इंधन भरत आहे व त्यावेळी वाहन चालकाला एक कॉल येतो. दुचाकीचालक कॉल घ्यायला जातो इतक्यात गाडीला मोठी आग लागते. अचानक लागलेल्या या आगीमुळे दुचाकीचालक व त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गाडीवरून खाली उतरतात. त्यानंतर काही वेळातच पेट्रोल पंपावरील कर्मचारी ही आग आटोक्यात आणतात. (हेही वाचा: Pune: टॉवेलने खेळत असताना नकळत लागला फास; 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कात्रज येथील घटना)

व्हिडीओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2023 09:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).