Nagpur: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्याला अटक; दिली होती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
आरोपी अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सक्करदरा पोलीस स्टेशनला पत्र पाठवले होते, ज्यामध्ये त्याने सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या अधिकाऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरातील रेशीमबाग परिसरातील डॉ हेडगेवार स्मारकाजवळील सभागृहाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमधील उपकार्यकारी अभियंत्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, आरोपी अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सक्करदरा पोलीस स्टेशनला पत्र पाठवले होते, ज्यामध्ये त्याने सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. सभागृहातील महावितरणचा आधीच नियोजित कार्यक्रम थांबवण्याचा यामागचा हेतू असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement