N.D.Patil Passes Away: शेकापचे ज्येष्ठ नेते, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन; कोल्हापूर येथील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शेकापचे ज्येष्ठ नेते, एक झुंझार व्यक्तिमत्व प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचे कोल्हापूर येथे निधन झाले

N.D.Patil Passes Away (संग्रहित संपादित प्रतिमा)

शेकापचे ज्येष्ठ नेते, एक झुंझार व्यक्तिमत्व प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते, कष्टकर, सामाजिक चळवळीतील कार्याचा वटवृक्ष अशी त्यांची ख्याती होती. आज दुपारी साधारण 12 वाजता कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एन.डी.पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 साली ढवळी (नागाव), जि.सांगली येथे झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement